इतिहास आठवतो. अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे व दुर्दैवाने मुलाचे निधन झाल्यावर राघोबादादा त्यांच्या राज्यावर चाल करून गेले. अहिल्याबाईनी महिलांची फौज तयार करून त्या लढाईला सज्ज झाल्या व त्याचवेळी त्यांनी राघोबादादाला एक संदेशही पाठवला. त्यांनी लिहिलं, 'माझा पराभव झाला तर कोणालाच आश्चर्य वाटणार नाही, पण तुमचा पराजय झाला तर? विचार करा.' राघोबादादा नी बिनशर्त माघार घेतली. हे आठवायचे कारण इराण अमेरिका बवाल. ट्रम्पला इराणने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवायला नकोत, अणुबॉम्ब बनवायला नको, कारण इस्राएलला धोका. एपस्टिनने अमेरिकन अध्यक्षाचं माकड केलंय, मदारी सांगतो तस नाचणारं. आज यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्या. आता म्हटल्याप्रमाणे ट्रम्पला इराणबरोबर युद्ध करावं लागणार. अफगाणिस्तान, इराक मध्ये अमेरिकेबरोबर युरोपीयन देशही होते, आणि आता अमेरिका एकटा आहे. आणि त्या देशाचं लष्कर आणि आयुधं तोकडी होती. ट्रम्पने सायकॉलॉजीकल प्रेशर आणण्यासाठी *आर्माडा* मिलिटरी बिल्ड अपला ट्रम्पचा काऊबॉय शब्द, इराणच्या दिशेने आणला. पण इराण काही बधला नाही. खामेनेईने तर सरळच सांगितलं हिंमत असेल तर हल्ला करून दाखव....
Posts
वोट चोरी
- Get link
- X
- Other Apps
व्होट चोरी न होनेके लिये हम सुझाव देना चाहीये। सिर्फ आरोप करके छूट नही सकते। मेरी रायसे निम्नलिखित प्रयोग कर सकते है। आप सोचिये। मान लीजिए कि एक शहर में एक विधानसभा क्षेत्र में लगभग 300 बूथ यानी 300 ईवीएम की आवश्यकता होती है। अगर हम पुणे का उदाहरण लें तो वहां 8 विधानसभा क्षेत्र हैं. यानी पुणे में 8 x 300 = 2400 ईवीएम की जरूरत होगी. यदि इन 2400 मशीनों को एक ही स्थान पर व्यवस्थित किया जाता है, तो उम्मीदवारों को यह तय करना होगा कि उनके निर्वाचन क्षेत्र में कौन सी मशीनों का उपयोग किया जाए। यदि एकाद निर्वाचन क्षेत्र में 10 उम्मीदवार हैं, तो उनमें से प्रत्येक यादृच्छिक रूप से 30 मशीनों का चयन करेगा। इसके बाद उसे अलग कर उस पर प्रत्याशियों और चुनाव चिह्न की सूची चिपका कर बूथ पर भेज दिया जायेगा. इसमें मुश्किल क्या है? फिलहाल इतनी ही मशीनें निर्वाचन क्षेत्रों में भेजी जानी हैं, केवल उम्मीदवारों के नाम और चुनाव चिह्न वाली पट्टी (जो आयोग पहले ही लगा रहा था) बाद में लगानी है। मौजूदा आयोग इसके लिए कभी तैयार नहीं होगा. एक बार उम्मीदवार तय हो जाने के बाद, मतदान तक 21 दिन बचे हैं। उन 21 दिनों में ...
माझी गृहलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
हा लेख 'महाराष्ट्र टाईम्स'च्या 23 जानेवारी 2027च्या सर्व आवृत्त्यात 'माझी गृहलक्ष्मी' या कॅप्शनने प्रकाशित झाला होता. ------ आमचं लग्न 1974 मध्ये झालं. पूर्वाश्रमीची ती विजयालक्ष्मी कामत. आजोळ गोव्याचं, पण वडील हुबळीचे उद्योगपती. त्यावेळी ती फक्त 24 वर्षांची होती. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. दरम्यान काही कारण नसताना मी चांगली नोकरी सोडून धंदा करायचा म्हणून मित्रांबरोबर जॉईन झालो आणि नंतर वेगवेगळे उद्योग करत मित्रांकडून फसवून घेत राहिलो. मला नियमित उत्पन्न नव्हतं त्यामुळे कोंड्याचा मांडा करून तिला दिवस काढावे लागायचे आणि दुर्दैव म्हणजे मला याची जाणीवच नव्हती. या दरम्यान आम्ही सात वेळा भाड्याच्या जागा बदलल्या. जागा बदलताना सामानाची हलवाहलवी आणि त्यानंतर नवीन जागेत पुन्हा संसार उभा करण्याचा भार तिच्यावरच पडायचा. वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलांना शाळेत ने-आण करायची हे सगळं तिलाच बघायला लागायचं. त्यावेळी डेक्कन जिमखाना (क्लब), चिन्मय मिशन, पुणे शहर युवक काँग्रेस नंतर मोठी काँग्रेस, लायन्स क्लब अश्या सर्वच क्षेत्रात 'कटी पतंग' प्रमाणे माझं विहरण चालू होतं. ...
मन आणि बुद्धी
- Get link
- X
- Other Apps
15 नोव्हेंबर 2025 मन आणि बुद्धी यात नेहमीच संघर्ष चालू असतो. मन म्हणजे भावना. आपल्याला जे सुख आणि सोयीचं होईल, त्यामागे मन धावतं, पुष्कळदा त्यात सारासारविचार नसतो. म्हणजे आपण जे करणार ते योग्य की अयोग्य? हा जो विचार बुद्धीच्या पातळीवर करायचा, त्याला मन पूर्णपणे डावलून टाकतं. व्यसन म्हणजे मनाचा बुद्धीवर ताबा. दारू पिणे, जुगार खेळणे हे वाईट आहे, असं तर लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. तरीदेखील तो विचार डावलून मन पुनःपुन्हा त्या गोष्टींकडे वळत, कारण मनाने (क्षणिक सुखासाठी) आपल्यावरील बुद्धीचा पगडा भिरकावलेला असतो. नुसते व्यसनाधीनच नाहीत, तर सर्वसाधारणपणे प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात असंच वागत असतो. यावर उपाय म्हणजे बुद्धीने मनावर ताबा मिळवणे! आणि ते सोप्प आहे का? तर नाही. समजा, मला आमरस आवडतो आणि एक वाटी आमरस खाल्यानंतरही मला दुसरी वाटी हवी असते, तेंव्हा माझ्या मनात द्वंद्व सुरू होतं. 'आता पुरे, नाहीतर बाकीचे काय म्हणतील' असं बुद्धी मला सांगत असते, पण त्याचवेळी 'काय हरकत आहे आणखी एखादी वाटी आमरस खाल्ला तर, रोज थोडंच असं मिळणार?' अशी भलामण मन करत असतं. इथे थोडी...